मुलांना मास्क घालण्याबाबत ‘ही’ घ्या काळजी; पहा काय म्हटलेय WHO ने

सध्या करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशावेळी कोणताही ठोस उपचार किंवा लस उपलब्ध नसल्याने जगासमोरील डोकेदुखी कायम आहे. त्यातच लॉकडाऊन आता हटण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच भले शाळा सुरू झालेल्या नसतील पण मुलेही खेळण्यासाठी किंवा घरानजीकच्या क्लासला जाण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी मुलांनी नियमित मास्क वापरण्याचा पालकांचा दबाव आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिशानिर्देश जारी केले आहेत.

त्यांनी याबाबत स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शन केले आहे. साध्य छोट्या-मोठ्या कितीही वयाच्या मुलांना मास्क घालायला लावण्याचा सपाटा चालू आहे. मुलांनी जर अशावेळी कंटाळून किंवा मास्क टोचत असल्याने किंवा त्याने येणाऱ्या घामामुळे अडचणीतून नाहीच मास्क घातला तर त्यांना धपाटे मारायलाही पालक मागेपुढे पाहत नाहीत. अशावेळी जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, १२ वर्षांखालील मुलांना मास्क घालण्याची अशी जास्त सक्ती करण्याची गरज नाही. फ़क़्त त्यांना जास्त किंवा अपरिचित मुलांशी खेळायला जाऊन देऊ नये. तसेच अशावेळी खेळताना त्यांना मास्क घालण्याचीही गरज नाही.

छोटी मुले घरच्याच परिसरात खेळतात. त्यांचा संपर्क मोजक्या व्यक्तींशी येतो. मात्र, मोठ्या मुलांचा संपर्क जास्त येत असल्याने १२ वर्षांपुढील मुलांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अशा मुलांनी शक्यतो जास्त बाहेर पडू नये. त्यांनी आपल्याच परिसरात खेळावे. तसेच खेळतानाही त्यांनी मास्क वापरावा. अपरिचित आणि खूप जास्त प्रमाणात बाहेर राहणाऱ्यांशी व स्वच्छतेची काळजी न घेणाऱ्यांशी संपर्क टाळावा. अशा पद्धतीने कोणतेही औषध नसल्याने आता सध्या काळजी घेऊनच आपण करोना विषाणूला हरवू शकतो. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शन केले आहे.

खेळताना आणि कसरत करताना शक्यतो मास्क वापरू नयेत. मात्र, अशावेळी योग्य पद्धतीचे सामाजिक अंतर ठेऊनच अशा गोष्टी कराव्यात. तसेच ज्या भागात, परिसरात किंवा कुटुंबात करोनाचा फैलाव झालेला आहे. अशा भागात मुलांसह कोणीही जाऊ नये. आयसोलेशन पिरीयड समाप्त होऊन संबंधित रुग्ण ठीक झाल्यावरच त्यांच्याशी संपर्क ठेवावा. करोना हा कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी योग्य ती काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

व्यायाम करतानाही अनेकजण मास्क वापरतात. मात्र, अशावेळी योग्य स्वच्छता आणि वैयक्तिक अंतर ठेऊन सर्व क्रिया कराव्यात. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर कारणाने नियमित आजारी असलेल्यांनी मात्र, नियमितपणे मास्क वापरावा. अशा रुग्णांनी कमीतकमी इतरांशी संपर्क ठेवावा. ५ वर्षांखालील मुलांना मास्क वापरू नये. मात्र, त्यांना बाहेर नेताना काळजी घ्यावी. शक्यतो त्यांना बाहेर नेऊ नये. तसेच ६ ते ११ या वयोगटातील मुलांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अशा मुलांनी बाहेर जाताना मास्क वापरावा. तसेच आपल्या मुलांची व कुटुंबियांची काळजी म्हणून पालकांनीही बाहेर जाताना मास्क वापरावा आणि नियमितपणे हात धुवावेत.

संशोधनातून असे दिसले आहे की, मुलांमुळे करोनाचे संक्रमण तुलनेने खूप कमी होते. मात्र, ते होतच नाही असे कुठेही दिसलेले नाही. त्यामुळे मुलांची काळजी घ्यावीच लागेल. घरातील स्वच्छता आणि वैयक्तित स्वच्छता यांच्याकडेही लक्ष द्यावे. १२ वर्षांपुढील मुलांची काळजी घ्यावी. अशा मुलांना जास्त बाहेर पडू देऊ नये. सध्या हर्ड इम्युनिटी कुठेही डेव्हलप झाल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीच्या माहितीवर विसंबून न राहता सर्वांनी काळजी घ्यावी. लस आणि औषध उपलब्ध नसल्याने प्रत्येकाने वैयक्तिक आणि दुसऱ्यांची काळजी घेणे हाच एकमेव उपाय सध्या आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here