Trending : झुकेर्बर्गला घाम फोडणारी ती सिनेटर होती हॉटेलमध्ये वेट्रेस; होय, वाचा तिची प्रेरणादायी स्टोरी

कोणाचे आयुष्य कोणाला कुठे घेऊन जाईल याच काहीही नेम नसतो. कारण, सातत्यपूर्ण काम करीत राहणाऱ्या कोणालाही यश मिळतेच की. अशीच एक भन्नाट आणि प्रेरणादायी स्टोरी आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे एका महिलेची जी सध्या अमेरिकेच्या कॉंग्रेसमधील सिनेटर आहे. अगोदर ती हॉटेलात काम करणारी बारटेंडर आणि वेट्रेस होती. तिने घर चालवण्यासाठी आईला मदत म्हणून घरांची साफसफाई आणि ड्रायव्हिंगचीही कामे केलेली आहेत.

आपल्याकडे कोणताही नेता कोणाचा पुत्र किंवा पुत्री आहे याला जास्त महत्व असते, आहे आणि भविष्यात राहीलही. मात्र, तरीही काहीजण आपल्याकडे हे चक्रव्यूह भेदून नेते होतात आणि यशस्वीही होतात. परंतु, नंतर नेता झाल्यावर ते फुटटाईम नेते बनतानाच फुलटाईटही बनतात. काहीजण तर नसलेली गरिबी विकूनही नेते होतात आणि वर्षानुवर्षे ही राजकीय जहागिरी सांभाळतात. मात्र, अमेरिका, युरोप व इतर देशात हा नियम नाही तर अपवाद आहे. आपल्याकडेही याला काही सन्माननीय अपवाद आहेत. पण त्यांच्यावर नंतर प्रकाशझोत टाकूया. आज आपण स्टोरी वाचणार आहोत ती आहे अलेक्झांड्रिया ओकासिओ क्वार्त्झ (alexandria ocasio-cortez) यांची.

सध्या फेसबुक कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना घाम फोडणारी आणि पाणी प्यायला भाग पडणारी कर्तव्यदक्ष सिनेटर म्हणून त्यांची जगभरात चर्चा आहे. अलेक्झांड्रिया यांनी केंब्रीज अनालीटीका या फेसबुकने जाहिरात विकण्याच्या नावाखाली घातलेल्या गोंधळाबाबतच्या प्रकरणाबाबतच्या समितीत असताना मार्कला घाम फोडला आहे. जाहिरात करण्याच्या नावाखाली राजकीय गोंधळ घालणाऱ्या फेसबुकवाल्या मार्कला त्यांनी जाहीरपणे झालेल्या चर्चेत नाकीनऊ आणणारे प्रशन विचारल्याचा व्हिडिओ जगभरात ट्रेंडमध्ये आहे. एका श्रीमंत व्यक्तीला ही बाई कशी अडचणीत आणणारे प्रश्न करतेय याचे अनेकांना कौतुक आहे.

मात्र, वाचक मित्र-मैत्रिणींनो, त्या अलेक्झांड्रिया नावाच्या सिनेटरसाठी ही मोठी गोष्ट नाही. कारण देशातील एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणू तिचे ते कर्तव्य असल्याची तिची भावना आहे. कोणत्याही व्यक्तीपेक्षा आणि सरकारपेक्षा देश मोठा आहे असेच तिला वाटते. तर, अलेक्झांड्रिया बाई काही गर्भश्रीमंत किंवा बड्या आई-बापाची लेक म्हणून वाढलेल्या नाहीत. ३० वर्षे वयाच्या अलेक्झांड्रिया यांनी बोस्टन विद्यापीठात अर्थशास्त्र आणि सामरिक शास्त्र या विषयात पदवी घेतलेली आहे. मात्र, २००८ मध्ये वडील कर्करोगाने निधन पावल्याने घराची गरज म्हणून त्यांनी हॉटेलात काम केले. नंतर त्यांनी मूव्ह ओन, ब्लॅक लिव्हस मॅटर आणि डेमोक्रसी फॉर अमेरिका आदि नागरी चळवळीत सहभाग घेतला.

अशा पद्धतीने घराच्या आघाडीवर लढतानाच अलेक्झांड्रिया यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात झोकून देऊन काम केले. २०१८ मध्ये त्या अमेरिका नावाच्या जागतिक महासत्ता असलेल्या देशातील सिनेटर बनल्या आहेत. अगदी कमी वयात त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. एकूणच आपल्या कामावर आणि विचारांवर निष्ठा असेल तर आपण काहीही करू शकतो आणि जगही जिंकू शकतो असाच आत्मविश्वास अलेक्झांड्रिया यांच्याकडे आहे. व्यावहारिक जगात तावून-सुलाखून निघालेल्या अलेक्झांड्रिया यांनीच आता डाटा चोरी केल्याचा आरोप असलेले जगातील एक नवश्रीमंत बनलेल्या मार्क झुकेरबर्ग याला उत्तर देताना बोबडी वळायला लावली आहे.

अमेरिकेतील अलेक्झांड्रिया यांची ही स्टोरी आपल्या सर्वांना भन्नाट वाटेल. होय, ती स्टोरी आणि त्यांचा प्रवास भन्नाट आहेच. परंतु, तिथे असे नेते खूप आहेत. तिथे कोणतेही काम छोटे नसते. कामाला आदर देण्याची तिथली संस्कृती आहे. त्याला जात चिकटवण्याची नाही. कारण, तिथे नेता होण्यासाठी क्रूर विचारांचा, फ़क़्त पैसेवाला किंवा पातळयंत्री माणूस लागत नाही. असे महाभाग तिथे अपवाद असतात. तिथला नियम आहे तो सामान्य माणसाना समान राजकीय संधी देण्याचा आणि देशाचे संविधान व नागरिक यांच्याविषयी कर्तव्याची भावना ठेवण्याचा. जो आपल्याकडे अपवाद बनला आहे. तर, मित्र-मैत्रिणींनो, फ़क़्त ही स्टोरी वाचू नका तर शेअर करा आणि आपला देश असा प्रगल्भ राजकीय विचारांचा होण्यासाठी काय करता येईल ते पहा. कारण, १९७० नंतर आपल्याकडे असे राजकीय नेते सापडणे हेच दुर्मिळ झालेले आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे

अधिक माहितीसाठी वाचा https://en.wikipedia.org/wiki/Alexandria_Ocasio-Cortez किंवा गुगलवर सर्च करा..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here