धक्कादायक : दिल्लीतील सर्वेमधून पुढे आली ‘ही’ माहिती; पहा covid 19 चा सीरोलॉजिकल रिपोर्ट

दिल्लीसह देशभरात करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशावेळी दिल्ली शहरात केलेल्या सीरोलॉजिकल (Serological) सर्वेमध्ये काही महत्वाची माहिती पुढे आलेली आहे.

संपूर्ण दिल्ली शहरात सीरोलॉजिकल सर्वेक्षण चालू आहे. त्याद्वारे दिलीईत किती नागरिकांना या विषाणूची लागण झालेली आहे, तसेच हर्ड इम्युनिटी डेव्हलप होत आहे किंवा नाही, यावर अभ्यास केला जात आहे. अशावेळी आताच्या विश्लेषणानुसार असे स्पष्ट झाले आहे की, दिल्लीत ५ वर्षे वयाच्या लहान मुलांसह १७ वर्षे वयाच्या टीनएजर मुलांना करोना विषाणूची सर्वाधिक लागण झालेली आहे. एकूण वयानुसार याचे वेगवेगळे भाग पडून दिल्ली प्रशासनाने हा निष्कर्ष काढला आहे. एकूणच अशा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे न दिसता त्यांच्यात याच्या अँटिबॉडीज विकसित होत आहेत.

५ ते १७ वर्षे वयाच्या एकूण ३४.७ टक्के मुलांमध्ये अशा पद्धतीच्या अँटिबॉडीज आढळल्या आहेत. तर, ५० पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ३१.२ टक्के लोकांना कोविड १९ च्या अँटिबॉडीज आढळल्या आहेत. यासह १८ ते ४९ या वयोगटातील २८.५ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या आहेत. दिल्ली सरकारने सीरोलॉजिकल सर्वेसाठी एक खास समिती नियुक्त केली आहे. त्या समितीचे प्रमुख डॉ. महेश वर्मा यांनी माध्यमांना माहिती देताना वयोगटानुसार झालेला हा परिणाम सांगितला आहे. डॉ. वर्मा यांनी म्हटले आहे की, मुलांना घरात ठेवणे मोठे जिकीरीचे काम आहे. अशावेळी मग शाळेत ते जाऊन शकत नसल्याने त्यांना योग्य अशी काळजी घेऊन बाहेर खेळण्यासाठी जाऊ द्यावेच लागणार आहे.

  दिल्लीत असेही काही मुले आढळलेले आहेत ज्यांना घरात राहूनच पालकांमुळे करोना झालेला आहे. तर, काही ठिकाणी अशाही केसेस आढळल्या आहेत की, ज्यांनी घराच्या बाहेर न जातच सर्व काळजी घेतली आहे. तरीही अशा कुटुंबियांना कोविड १९ आजार झालेला आहे. अशी बरीच प्रकरणे दिल्लीत सापडली आहेत. एकूणच १५ हजार नमुना सर्वेक्षणातून आलेल्या माहितीवर करोना विषाणूचा अभ्यास दिल्लीतील तज्ञांची टीम करीत आहेत. १ ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत झालेल्या या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे येत आहे.

  अशा सर्वेक्षणात नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी करोना विषाणू आणि SARS-CoV-2 याच्या अँटिबॉडीज किती टक्के नागरिकांमध्ये आहे याचा तपास करण्याची टेस्ट घेतली जाते. सीरोलॉजिकल सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा १ ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत केला जाणार आहे. आतपर्यंत आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक रुग्ण दक्षिण दिल्ली भागात सापडले आहेत. दिल्लीत एकूण ११ जिल्हे असून त्या सर्व भागात नमुना निवड पद्धतीने सर्वेक्षण केले जात आहे. पहिले सर्वेक्षण २७ जून ते १० जुलै या कालावधीत करण्यात आलेले होते. त्यात दिल्लीतील २१ हजार ३८७ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने राजधानी दिल्लीतील करोना आटोक्यात आणण्यासाठीची दिशा ठरवण्यासाठी हे सर्वेक्षण केले आहे.

  ‘या’ वयातील लोकांना किंवा ‘अशी’ तब्बेत असलेल्यांना करोना विषाणूची बाधा होत नाही. किंवा झाली तरी त्यांच्यात कोणतेही लक्षण दिसत नाहीत या सगळ्या अफवांचे पिक देशभरात आलेले आहे. त्याचवेळी करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भले जास्त नसेल मात्र, मृत्यू होत आहेत. डॉक्टर लॉबी अशावेळी लक्ष्य केली जात आहे. एकूणच सोशल मिडीयामध्ये याबाबत अशास्त्रीय माहिती पसरवली जात आहे. अशावेळी दिल्ली सरकारने ठोस माहिती संकलित करण्याचा हा नमुना निवड सर्वेक्षणाचा शास्त्रीय पर्याय वापरला आहे. त्यामुळे एकूण देशभरात धोरणात्मक पद्धतीने कोणते बदल करावे लागतील याचेच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत.

  संपादन : विनोद सूर्यवंशी

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here