असे बनवा चटपटीत पालक-पनीर; डायटिंगची ‘ही’ रेसिपी वाचा, ट्राय करा अन शेअरही करा

सध्या अवघे जग लॉकडाऊन झालेले आहे. अशावेळी हॉटेल विसरून घरात घरातच काय असेल ते आपल्याला खावे लागत असेल. किंवा काहींना हॉटेलात जाऊन खायला आवडत नसेल. तर, अशा सर्वांसाठी आज आपण पालक-पनीर या सुप्रसिद्ध डिशची रेसिपी देत आहोत.

पालक हा एक हेल्दी आणि मस्त असा चवदार भाजीचा पदार्थ आहे. तो कोणत्याही पदार्थाची चव वाढवतो. त्याचवेळी जोडीला असलेले पनीर हे प्रथिनांचा स्त्रोत आहे. त्यामुळे पालक-पनीर ही एक उत्तम हेल्थी आणि टेस्टी अशीही भाजी आहे. किटोन किंवा कीट्टो डायट करून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनाही ही भाजी खूप पौष्टिक आहे. यामध्ये जर गरजेनुसार काजू तुकडे टाकले आणि लसणाची मस्त फोडणी दिली तरीही याचे पौष्टिक गुणधर्म वाढण्यासह चवही भन्नाट होते.

अगदी कुठल्याही शुद्ध शाकाहारी किंवा मांसाहारी माणसाचा हॉटेलमध्ये गेल्यावर प्राधान्याने खायचा पदार्थ म्हणजे पालक पनीर. एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही डिश असते. त्यातही वेगवेगळे इतर काही पदार्थ टाकून मग पालक-पनीरचे नाव बदलले जाते. हाच पालक पनीर खवय्ये मंडळींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखे पालक पनीर कसे बनवायचे आणि सर्व्ह करायचे याचीही माहिती देत आहोत.

  यासाठी लागणारे साहित्य असे : कापलेले पनीरचे तुकडे (एक वाटी किंवा आपल्या गरजेनुसार कमी-जास्त), २ चमचे आल्याची बारीक पेस्ट, २ कप मस्त दुध, ५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (भाजी तिखट करण्याच्या हिशोबाने आणि मिरच्यांची तिखट चव कमी-जास्त असल्याचे लक्षात घेऊन यात बदल करावा), ३ चमचे फेटलेली क्रिम, पालकाच्या ४ जुड्या बारीक चिरून घ्याव्यात, १ चमचा गरम मसाला, १ चमचा कसुरीमेथी, ३ टोमॅटोची प्युरी, चवीनुसार लागणारे मीठ आणि लोणी आदि. यासह आपणास गरज वाटली तर यात ड्रायफ्रुट्स किंवा इतर घटक आपण टाकू शकता.

  अशा पद्धतीने किचनमध्ये तयारी करून ठेवा आणि मगच स्वयंपाकाच्या महत्वाच्या कामाला लागा. त्यासाठी प्रथम पालक भाजीच्या जुड्या चांगल्या धुवून घ्याव्यात. धुतल्यानंतर याच भाजीला आपल्या गरजेनुसार कमी-जास्त पद्धतीने चिरून घ्या. हीच चिरलेली भाजी जर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतली तर तिला आणखी मस्त चव येते. अशी चिरलेली किंवा मिक्सरमध्ये बारीक केलेली पालक मग पालक थंड करून घ्या. नंतर अर्धा मिनिटे मेथीच्या कोरड्या पानांना तव्यावर परतून घेऊन त्यात टॉमेटोची प्युरी टाकावी. अगोदरच टाकलेले तेल  त्याला सुटेपर्यंत मस्तपैकी परतवून घ्यावे. अशावेळी मस्त परतवले तर चवीत चांगला फरक पडतो. नंतर पालकाची केलेली पेस्ट, मेथी यांना मिसळून घेऊन त्यात दुध टाकावे लागते. दुध खूप जास्त टाकू नये.

  अशा पद्धतीने पालक प्युरी तयार झाली की मग त्यात चवीनुसार गरम मसाला आणि क्रीम यासह पनीरचे तुकडे टाकावेत. मग मंद आचेवर परतून घेतानाच त्यात चवीनुसार मीठ टाकून किमान १० मिनिट शिजू द्यावे.

  असे केले की तुमचे चवदार पालक पनीर तयार होते. आता हे सर्व्ह करताना काळजी घ्यावी. कारण, चवदार असले तरी जेवणात गोडी येण्यासाठी कोशिंबीर आणि लोणचे टाकून घ्यायला काहीच हरकत नाही की. अशा पद्धतीने झटपट आणि स्वादिष्ट पालक पनीर तयार होते. आता हेच गरमागरम सर्व्ह करा आणि नात्यातला गोडवा वाढवा की..!

  संपादन : माधुरी सचिन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here