विटीदांडू : ‘कोले क्या.. कोले..कोले..’ करीत कल्ला करण्याचा भन्नाट खेळ

मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ करणाऱ्या अस्सल देशी खेळांचा आपल्याला सर्वांनाच विसर पडला आहे की. मात्र, आताच्या लॉकडाऊन काळात आणि नंतरही आपण घराच्या परिसरात सहजपणे खेळू शकतो असा खेळ म्हणजे विटी-दांडू. वयाची पस्तीशी पार केलेल्या अनेकांनी लहानपणी हा खेळ एन्जॉय केला असेलच. त्यातले राज्जे आल्यावर होणारा मज्जा आणि रडारड यांचे किस्सेही असतील अनेकांकडे खूप. तर, मित्रांनो, आज आपण आता त्याच खेळाची काही माहिती पाहणार आहोत.

ज्यांना कोणाला या खेळाची माहिती असेल त्यांनी आपल्या मुलांनाही पुन्हा याचे नियम व खेळण्याची मजा समजावून सांगा. आणि ज्यांना कोणाला याची माहिती नसेल त्यांनी मस्तपैकी ही माहिती वाचण्यासह गुगल करून आणखी माहिती घेऊन हा खेळ एन्जॉय करावा. गुगल केल्यावर तुम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विटीदांडू खेळताना दिसती. कारण, कोले करण्याची जी मजा आहे. ती कशातही नाही. अशीच मजा आपणही अनुभवा. आपल्या चिमुरड्यांना मजा करायला लावा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. हा यात एक अडचण आहे म्हणा. शहरी भागात हा खेळ खेळायचा तरी कसा? एखाद्याला विटी लागली किंवा एखाद्याच्या घराच्या काचा याने फुटल्या तर? अशावेळी गर्दीच्या ठिकाणी हा खेळ अजिबात ट्राय करू नका.

तर मित्रांनो, हा एक मजेशीर आणि वेळ घालवणारा खेळ आहे. फ़क़्त त्यामध्ये राज्जे आल्यावर एखाद्याला लक्ष्य करू नका इतकेच. रडारड आणि राडा बाजूला ठेऊन हा खेळ मस्तपैकी एन्जॉय करा. यामध्ये एका टीममध्ये कितीजण असावेत असा काहीही नियम नाही. हा खेळण्यासाठी दोघेजण पाहिजेत इतकेच. दोन किंवा दोनच्या पटीत कितीही जणांनी एकसमान दोन टीम करून हा खेळ खेळावा. त्यामध्ये विटी कोलावी लागते. याला काहीजण गिल्ली-दांडा असेही म्हणतात. तसेच विटी कोलण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की, काहीजण विटी खाली वाकून पाठीमागे कोलतात. तर, काही भागात हीच विटी खाली वाकून पुढे कोलली जाते.

काही भागात अजूनही याच्या खास स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, पश्चिम महराष्ट्र आणि खानदेशात आता हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात अखेरच्या घटका मोजत आहे. या खेळाचे काही नियम असतात. जसे प्रत्येक खेळाचे असतात तसेच. अगदी वेगळे आणि मजेशीरही. अगोदर कोणता संघ खेळणार यासाठी टॉस केला जातो. मग जो संघ टॉस जिंकेल ते प्रथम खेळतात. गलीतून विटी कोलली जाते. इतर संघाने ती झेलली पाहिजे. मग पुन्हा विटी फेकल्यावर तिला उडवून मारली जाते. एकदा-दोनदा अशी ही हवेतल्या हवेत विटी मारल्यावर आणि लांब गेल्यावर मग ते अंतर गलीपासून दांडू किंवा विटीने मोजले जाते. एकदा मारले असल्यास दांडूने आणि, जर तसे नसेल तर मग दोनदा मारलेले असल्यास विटीने. मात्र, जर मारता आलेच नाही तर खेळाडू फूस होतो आणि दुसऱ्याला संधी मिळते.

अशा पद्धतीने खेळताना ज्या संघाचे जास्त गुण भरतील तो यामध्ये जिंकतो. मग त्यावर राज्जे येते. किंवा मग त्याला स्पर्धेतील बक्षीस मिळते. आणि जिंकल्यावर मस्त कल्ला करता येतो. कारण, तीच तर देशी खेळांची खरी मजा आहे. हा खेळ खेळण्यासाठी कौशल्ये लागते. तसेच स्थिरचित्ताने हा खेळ खेळावा लागतो. खेळताना अनेकदा विटी एखाद्याच्या डोक्याला लागू शकते, त्यामुळे सगळ्यांना सावध खेळावे लागते.

लेखन व संपादन : विनोद सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here