‘हे’ पदार्थ खा आणि हेल्दी राहा; वजन कमी करायलाही होतो त्याचा फायदा

स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात सध्या सर्वांनाच आरोग्य आणि पोषक आहार घेण्याकडे लक्ष देता येईल असे नाही. मात्र, तरीही आपल्याला जीवनातील स्वप्नं पूर्ण करायला या दोन्ही घटकांकडे लक्ष द्यावेच लागेल. नाहीतर असे व्हायचे की पाहिलेले स्वप्न टप्प्यात यायचे आणि त्याचवेळी ते एन्जॉय करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसायचा.

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, आज त्यामुळेच आपण जरा जास्तवेळ वाचवा लागणारा मात्र जीवनात खूप उपयोगी ठरणाऱ्या माहितीचा लेख वाचणार आहोत. कंटाळा आला तर यामध्ये ब्रेक घ्या पण सगळा वाचा आणि त्यापैकी जास्तीतजास्त घटकांची अंमलबजावणी करा आणि नाहीच यातले काही मुद्दे पटले किंवा इतर सूचना करावीशी वाटली तर प्रतिक्रिया लिहा. आम्ही त्यानुसार मदत करण्याचा किंवा त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू.

प्रथम आपण पाहणार आहोत हेल्दी डायट अर्थात पोषक आहार हा घटक. आपण खातो त्यातून शरीराला लागणारे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळतील याची काळजी घ्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी पाहिल्यास आपल्याकडे प्रीष्ठमय पदार्थांची भरमार असते. आता आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून का होईना त्या जेवणात भरपूर तेल टाकले जाते. काहींना तर तर्रीबाज जेवण हेच हेल्दी जेवण वाटते. मात्र, त्याचवेळी शरीराला लागणारा महत्वाचा घटक असलेल्या जीवनसत्व आणि प्रथिने यांची त्यात मुबलकता असेलच असे काहीही नाही.

तेल आणि प्रीष्ठमय पदार्थ मापात खावे लागतात. हे जास्त खाल्ले की चरबी आणि वजन वाढून स्थूलता येते. ही स्थूलता फ़क़्त शारीरिक असते असे नाही. उलट यामुळे मानसिक स्थूलता येते. त्यातून आपली कार्यक्षमता कमी होते. त्यामुळेच हेल्दी डायट घेऊन आपली तब्बेत लईच स्लिम-ट्रीम नाही परंतु, लोकांना दिसायला चांगली आणि आपल्याला बेढब वाटणार नाही अशी तब्बेत करायला काय हरकत आहे. यामुळे आपला आरोग्याचा खर्च कमी तर होतोच, उलट कार्यक्षमता वाढते. ओबेसिटी ही समस्या नवीन पद्धतीच्या फास्टफूड व जंकफूड खाण्याने वाढत आहे. त्यामुळे नंतर मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्याही निर्माण होते. हे टाळण्यासाठी अशी पदार्थ अगदीच न खाता बेचव जगू नका. मात्र, त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवायला काय हरकत आहे?

आपण जेवणात पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या फळभाज्या घेण्याचे टाळतो. बटाटा एके बटाटा असा किंवा तत्सम प्रकारचा तोच-तो आहार घेण्याचे टाळा. जिभेचे चोचले पुरवतानाच कमी तेलात आणि जीवनसत्वयुक्त आहार घ्या. सध्या कीटोन / कीट्टो डायट नावाची कल्पना जोमात आहे. त्यामध्ये प्रथिनयुक्त आहार खावा लागतो. अनेकजण असा डायट फॉलो करतात. मुंबई-पुण्यातील अनेक डॉक्टर वजन कमी करण्यासाठी आणि इतर कारणासाठी हा आहार सजेस्ट करतात. असा आहार खाल्ल्याने वजन नक्कीच कमी होते. मात्र, मग शरीराला लागणारी जीवनसत्व मिळण्यासाठी त्यामध्ये सलाद आणि फळभाज्या व पालेभाज्या यांचेही प्रमाण ठेवावे.

तेल खाल्ल्याने किंवा वनस्पती तूप खाल्ल्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. मात्र, त्याचवेळी स्निग्ध पदार्थ असूनही गाय-म्हशीच्या दुधातून काढलेले तूप खाल्ल्याने तब्बेत एकदम टकाटक राहते. यासाठी जास्तीचा खर्च येतो हे मान्य. मात्र, तेलाने पचपचीत भाजी करण्याचा विचार सोडून कमी तुपात योग्य पद्धतीने शिजवलेले अन्न खायला प्राधान्य द्यावे. अंडी, मटन, चिकन, मासे, पनीर, सोया टोफू, कडधान्ये हे पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये प्रथिनांची गरज भागून निघेल. तसेच काजू, बदाम, मनुके, अक्रोड आदि ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानेही शरीराला फायदा होतो. आपल्या शरीराची गरज काय आहे हे समजून घेऊन मगच त्यानुसार डायट प्लान करा. बाजारात मिळणारी औषधे, काढे व पिण्याचे पदार्थ खाऊन-पिऊन वजन कमी करण्याच्या किंवा शरीर पिळदार करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. उलट आपल्या डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाने वजन नियंत्रित ठेवा आणि तब्बेतीत राहा.. आणि व्यायामही करा..!

पुढील भागांमध्येही आपण अशीच काही माहिती पाहरण आहोत. त्यासाठी आपल्याला पडणारे प्रश्न आम्हाला या इमेलद्वारे पाठवा किंवा खाली प्रतिक्रिया लिहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील भागात.. गुड बाय..!

लेखक : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here