150cc bikes : सध्या खरेदीदार जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्स खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे बजाज आणि यामाहाच्या या 150cc बाईकचे तरुणांमध्ये भुरळ पडली आहे, या बाईकमध्ये उत्तम मायलेज आणि जबरदस्त मिळत आहे. जाणून घ्या किंमत
या बाइक्समध्ये लांबच्या प्रवासासाठी एक विस्तृत सीट दिले असून या बाइक्स स्मार्ट फ्रंट लुक आणि मोठ्या टायरच्या आकारासह येतात. यात साधे हँडलबार आणि हाय एंड एक्झॉस्ट देण्यात आले आहे.
बजाज पल्सर किंमत
किमतीचा विचार केला तर ही बाईक 1.18 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. यात 149.68cc इंजिन दिले आहे, जे 14.3 bhp पॉवर जनरेट करते. बाइकमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही बाईक रस्त्यावर 49 kmpl पर्यंत मायलेज देत असून हे 13.5 Nm टॉर्क जनरेट करते.
ज्यामुळे ते हाय स्पीड देते. सेफ्टीच्या बाबतीत बाईकच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. या बाइकमध्ये एलईडी प्रोजेक्टर आणि डीआरएल दिले आहे.
बजाज पल्सरचे फीचर्स
- या बाईकमध्ये 14 लीटरची इंधन टाकी दिली आहे.
- या बाइकचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास इतका आहे.
- यात टेलिस्कोपिक फ्रंट आणि रियर ड्युअल सस्पेंशन दिले आहे.
- बाईकमध्ये तीन रंगांचे पर्याय दिले आहेत.
- बाईक 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.
किमतीचा विचार केला तर ही बाईक 1.22 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑफर केली जात आहे. बाईकच्या सीटची उंची 790 मिमी आहे. बाईकमध्ये 149 cc इंजिन आहे, ज्यामुळे ती सुमारे 45 kmpl चे मायलेज मिळेल. रायडरच्या सुरक्षेसाठी बाइकच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक आहेत. सुरक्षिततेसाठी बाइकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिली असून या बाइकचे वजन 135 किलोग्रॅम इतके आहे.
यामाहा FZ S FI चे फीचर्स
- या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल कन्सोल आहे.
- बाइकमध्ये तीन रंगांचे पर्याय दिला आहे. ही बाईक १२.२ बीएचपी पॉवर जनरेट करते.
- बाइकमध्ये 13.3 एनएमचा पीक टॉर्क आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.
- बाइकमध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे.
- ही बाईक 115 kmph चा टॉप स्पीड देईल.