iPhone Offers: Apple ने या आठवड्याच्या सुरुवातीला बाजारात iPhone 14 आणि iPhone 14 Plus चे यलो व्हेरियंट लॉन्च केले असून आता यांची प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे.
कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 पाच कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला होता. आयफोन 14 चा यलो व्हेरियंट 14 मार्चपासून खरेदी करता येईल. तूम्ही आता Apple च्या अधिकृत वेबसाइट, Amazon India आणि Flipkart वरून यलो व्हेरियंटसह स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल.
Apple ने आपल्या वेबसाईटवर यलो कर्ल व्हेरियंटची माहिती देखील दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की लोक 14 मार्चपासून iPhone 14 चे नवीन कलर व्हेरिएंट खरेदी करू शकतील. नवीन मॉडेल्सचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. iPhone 14 च्या यलो रंगाच्या व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे, तर iPhone 14 Plus च्या यलो रंगाच्या व्हेरिएंटची किंमत 89,990 रुपये आहे.
येथे मोठी सूट उपलब्ध
जर तुम्हाला यलो व्हेरिएंट iPhone 14 आणि iPhone 14 Plus स्वस्त किंमतीत खरेदी करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की Apple च्या वितरकांपैकी एक असलेल्या Redington ने एक मोठी घोषणा केली आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 15,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याचे वितरकांकडून सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना स्टोअर डिस्काउंट, बँक ऑफर आणि जुन्या आयफोनची देवाणघेवाण एकत्र करून ही सवलत मिळेल. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही या मॉडेल्सवर सूट देण्यात येत आहे.
iPhone 14 Plus तपशील
iPhone 14 Plus मध्ये यूजर्सला 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळतो. डिस्प्लेमध्ये सिरॅमिक शील्ड ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे.
iPhone 14 Plus मध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे ज्यात Hexa Core GPU चा सपोर्ट आहे.
iPhone 14 Plus मध्ये मेमरीचे तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ग्राहक 128GB 6GB रॅम, 256GB 6GB रॅम, 512GB 6GB रॅम पर्याय निवडू शकतात.
iPhone 14 Plus च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा f/1.5 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा आहे. दुसरा कॅमेरा देखील फक्त 12 मेगापिक्सेलचा आहे. सेन्सर शिफ्ट OIS चे फीचर प्रायमरी कॅमेऱ्यात देण्यात आले आहे.
iPhone 14 Plus च्या फ्रंटमध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
यामध्ये ग्राहकांना 4323 mAh बॅटरी मिळते जी 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.