Admission : आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. हजारो रुपये खर्च करून पालक मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये (English Medium School) गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे शाळांचा पट टिकवणे, नवीन प्रवेश मिळवणे, शाळांची गुणवत्ता वाढ, बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्यानुसार धोरणात बदल अशा अनेक आघाड्यांवर मराठी शाळांना काम करावे लागत आहे. इतकी सगळी आव्हाने समोर असतानाही इंग्रजी माध्यमांना मराठी शाळा आता स्पर्धा देत आहेत. यंदा तब्बल 1393 इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश (Admission) घेतला आहे.
Jio ने दिला भन्नाट ऑफर; आता कमी किमतीत ग्राहकांना Hotstarसह बरेच काही; जाणुन घ्या डिटेल्स https://t.co/0mlLOwVSze
— Krushirang (@krushirang) July 31, 2022
जिल्हा परिषदांच्या (Jilha Parishad) मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे. या शाळांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळत असल्याने येथील प्रवेश वाढले आहेत. या शाळा भरमसाठ डोनेशन घेत असल्या तरी येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे मराठी शाळांची गुणवत्ता वाढ करण्याबरोबरच पटसंख्या वाढ करण्याकडेही शिक्षण विभागाला लक्ष द्यावे लागत आहे. विभागाकडून प्रयत्नही सुरू असून दरवर्षी काही प्रमाणात विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांकडे वळत आहेत.
Electric Car : एका चार्जमध्ये जास्त रेंज देणार इलेक्ट्रिक कार ; फक्त चालवताना ‘हे’ काम करू नका https://t.co/kx2iFPhuIc
— Krushirang (@krushirang) July 31, 2022
हे बदल समाधानकारक
जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत पालकांमध्ये विश्वास वाढला आहे. डिजीटल शाळा (Digital School), स्कॉलरशीप परीक्षेतील (Scholarship Examination) यश, वाढते उपक्रम याबद्दल पालक वर्गातून आता समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण, इंग्रजी शाळांतून विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांत येत आहेत.
मराठी शाळेत आलेले विद्यार्थी
अकोले 47, जामखेड 78, कर्जत 52, कोपरगाव 104, नगर 181, नेवासा 53, पारनेर 119, पाथर्डी 27, राहाता 192, राहुरी 295, संगमनेर 97, शेवगाव 23, श्रीगोंदा 68, श्रीरामपूर 57