125cc Scooters : तुम्हाला कमी किमतीत उत्तम फीचर्स असणाऱ्या स्कुटर खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. तुम्ही होंडा आणि सुझुकीच्या स्कुटर्स सहज खरेदी करू शकता. ज्या तुमच्या बजेटमध्येही येतील.
Honda Dio मध्ये मिळेल जबरदस्त मायलेज
किमतीचा विचार केला तर ही स्टायलिश स्कूटर 87,370 हजार रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. स्कूटरचे वजन फक्त 105 किलो असल्याने लहान मुले, वृद्ध लोक आणि घरातील महिला रस्त्यावर सहजपणे ती नियंत्रित करता येते. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 48 kmpl पर्यंत जास्त मायलेज देईल. यात 5.3 लीटरची मोठी इंधन टाकी दिली आहे.
Honda Dio मध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स
Honda Dio च्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिले असल्याने त्यावर प्रवास करताना फारसा थकवा येत नाही. ही स्कूटर 109.51 cc इंजिनसह येत असून ती 7.65 bhp आणि 12-इंच टायर दिले आहे. स्कूटरच्या सीटची उंची 650 मिमी असून कंपनी त्याचे 4 प्रकार देत आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 11 रंग पर्याय देण्यात आला आहेत.
Suzuki Access 125 ची किंमत
ही स्कूटर 97925 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. यात 124 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. हे सॉलिड इंजिन 8.7 पीएस पॉवर आणि 10 Nm टॉर्क जनरेट देते. स्कूटरमध्ये 5 लिटरची इंधन टाकी असून सीटची उंची 773 मिमी आहे.
तिचे वजन 103 किलो आहे, स्कूटर हाय स्पीडसह 45 kmpl मायलेज मिळेल. यात ड्रम आणि डिस्क ब्रेक दोन्ही पर्याय दिले आहेत,कंपनीची स्कूटर 4 प्रकारांमध्ये येते. स्कूटरच्या टॉप मॉडेलची किंमत 1.09 लाख रुपये इतकी आहे. यात 21 लीटर अंडरसीट स्टोरेज आहे.