दिल्ली :
शेतकरी विरोधी कृषी कायदे आणल्यामुळे देशात एका बाजूला शेतकर्यांनी आंदोलनाचे अस्र उपसलेले आहे. तर दुसर्या बाजूला पेट्रोल आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीमुळे सामान्य माणूसही त्रस्त झाला आहे. लॉकडाउन नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुरू झालेली वाढ ही अजूनपर्यंत थांबलेली नाही.
आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली. या पेट्रोल आणि डिझेलदरवाढीचा फटका बसल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेकडून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे आजच्या इंधन दरवाढीने पेट्रोल विक्रमी पातळीवर आहे. तर डिझेलदेखील उच्चांकी स्तराच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजप सरकारनं गेल्या सहा वर्षांत पेट्रोलवर एक्साइज शुल्कात २३.७८ रुपये प्रती लीटर तर डिझेलवर २८.३७ रुपये प्रती लीटरची वाढ केली. म्हणजेच, पेट्रोलच्या एक्साइज शुल्कात २५८ टक्क्यांनी तर डिझेलच्या एक्साइज शुल्कात ८२० टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
मुंबईत पेट्रोल ९३ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोलने ८६ चा टप्पा ओलांडला आहे. तर कोलकात्यात डिझेल पहिल्यांदाच ८० रुपयांवर गेले आहे. परभणीत पेट्रोल ९४ रुपये प्रती लीटर आहे तर राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे पेट्रोलने विक्रमी ऊंची गाठली आहे. तिथे पेट्रोल ९८.४० रुपये प्रति लीटर विकले जात आहे. जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- Bike Servicing Tips : दुचाकीचे आरोग्य जपा; ‘या’ पद्धतीने घरच्या घरीच घ्या काळजी
- Immunity Booster : इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी ‘हे’ फूड आहेत जबरदस्त; आहारात समावेश कराच
- World Alzheimer’s Day 2023 : लक्षातच राहत नाही ना.. नो टेन्शन, ‘हे’ फूड खा अन् डोकं चालवा भन्नाट
- WhatsApp Update : व्हॉट्सअॅपने आणलेत 3 खास फीचर्स; आता ‘ही’ कामे होतील पटकन
- Jio Air Fiber चा Airtel ला धक्का! पहा, किंमत आणि फीचर्समध्ये कोण आहे बेस्ट?