दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून देशात 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काही लोकल वृत्तपत्रांनीसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या केल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) या संदर्भात स्पष्टीकरण जारी केले आहे. 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याची बातमी चुकीची असल्याचे आरबीआयने ट्विट केले आहे.
या बातम्यात काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल झालेल्या काही अहवालांमध्ये असा दावा केला होता की, देशातील 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या सिरिज असणार्या नोटा आरबीआयमार्फत मार्च 2021 पर्यंत चलनामधून काढून टाकल्या जातील. म्हणजेच या नोटा मार्च 2021 नंतर चालणार नाहीत. पण आता आरबीआयने स्पष्टीकरण दिल्यानंतर या अफवा संपुष्टात आल्या आहेत.
अशा अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा तपासून बघणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्याला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच