नवी दिल्ली : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. रशियाने गुरुवारी पुन्हा एकदा युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर निशाणा साधला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युद्धग्रस्त देशातील सुमारे 1 कोटी लोक अंधारात राहत आहेत. राजधानी कीव, खार्किव हे दुसरे मोठे शहर, ओडेसा बंदर शहर, डनिप्रो आणि झापोरिझिया ही मध्य युक्रेनियन शहरे ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली आहेत.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले की, ‘युद्धाच्या या गंभीर काळात 1 कोटींपेक्षा अधिक रहिवासी विजेशिवाय राहत आहेत. ताज्या रशियन हल्ल्यांमुळे ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. त्याचवेळी झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत, सर्वांना मदत केली जात आहे. युक्रेनियन अभियंते मागील हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा हल्ला झाला आहे.
युक्रेनमधील कीवमध्ये थंडीच्या मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. काही दिवसांत येथे कडाक्याची थंडी पडेल. अशा परिस्थितीत वीज आणि पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढू शकते, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. राष्ट्रपती म्हणाले की हल्ल्याच्या आदल्या दिवशी, युक्रेनियन सैन्याने सहा रशियन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि पाच ड्रोन पाडण्यात यश मिळवले.
- हे वाचा : Russia Ukraine Crisis : रशियाच्या ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ; पहा, काय परिणाम होतील जगभरात ?
- Ukraine Russia War : बापरे..असे कसे हे युद्ध..! तब्बल ‘इतक्या’ लोकांनी सोडले स्वतःचे घरदार..