Besan kadhi Recipe: कढीचे नाव घेताच बेसनाची कढी मनात येते आणि ती बहुतेक घरांमध्ये बनवली जाते, पण काही वेगळे करून बघायचे असेल तर बटाट्याची करी बनवा. पहा रेसिपी या पुढीलप्रमाणे

https://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/top-ten-marathi-recipes-116072700007_1.html

साहित्य:

किलो बटाटे उकडलेले, सोललेले आणि मॅश केलेले, 2 टीस्पून मीठ (Salt), टीस्पून मिरची पावडर (Red chili powder , कप बेसन, तळण्यासाठी तेल, कप आंबट दही, 4 कप पाणी, 10 कढीपत्ता, टीस्पून जिरे, 2 अख्ख्या लाल मिरच्या, 1 टीस्पून चिरलेले आले, 1 /2 टीस्पून धने पावडर, धने पाने, गार्निशिंगसाठी

प्रक्रिया:

  • मॅश केलेले बटाटे (Potato), 1/2 टीस्पून मीठ, लाल तिखट आणि बेसन एकत्र मिक्स करा.
  • मिश्रणाचा एक चतुर्थांश भाग बाजूला ठेवा आणि उरलेल्या मिश्रणातून भजी  बनवा.
  • आता उरलेले मिश्रण दह्यामध्ये (Curd )घालून चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा.
  • एका जड तळाच्या पॅनमध्ये तेल टाका. त्यात कढीपत्ता, जिरे, अख्खी लाल मिरची घालून परतून घ्या. नंतर त्यात आले घालून परता.
  • दह्याचे मिश्रण, मीठ आणि धनेपूड घालून एक उकळी येऊ द्या. करी थोडी घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. मध्येच ढवळत राहा.
  • आता त्यात भजी टाका, काही मिनिटे उकळू द्या. हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Share.

Leave A Reply

Exit mobile version