मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याचवेळी टीम साऊदीने हॅटट्रिक घेतली.
न्यूझीलंडचा सुरुवातीला पहिला गडी लागलीच बाद झाला. त्यांनतर डेव्हन कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. कॉनवेने 22 चेंडूत 25 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगकडे झेलबाद झाला. कर्णधार ग्लेन फिलिप्स चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. मात्र चहलने त्याची विकेट घेत त्यालाही मैदानाबाहेर पाठवले. विल्यमसन चांगली खेळी करत असून त्याच्या जोडीला मिचेल खेळी करत आहे. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 3 गडी गमावत 71 धावा केल्या आहेत.
युझवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्टच्या जागी अॅडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. पहिला T20 सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
- हेही वाचा:
- भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का; फिन ऍलन स्वस्तात मैदानाबाहेर परतला
- भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का; फिन ऍलन स्वस्तात मैदानाबाहेर परतला