मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज म्हणजेच बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियासाठी या सामन्यातील विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारत मालिका बरोबरीत आणू शकतो. त्याचबरोबर यजमान टीम इंडिया मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
श्रेयस अय्यरचे अर्धशतक एका धावेने हुकले. अय्यरला डेव्हॉन कॉनवेने लॉकी फर्ग्युसनने बाद केले. श्रेयस ५९ चेंडूत ४९ धावा करून बाद झाला. भारताने पाचवी विकेट गमावली तेव्हा त्याची धावसंख्या १२१ धावा होती. आता क्रिझवर दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने दोन नवे फलंदाज खेळी करत आहेत.
भारताने आपले विकेट लवकरच गमावल्याने भारताला आता खूप सावधतेने आपली खेळी करावी लागणार आहे. भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्याने भारतापुढे चांगली धावसंख्या उभारून शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत करने खूपच कठीण झालेले दिसते आहे. या सामन्यात रिषभ पंत पुन्हा खराब फॉर्ममध्ये दिसला तर सुर्यकुमार यादव आजही चालू शकला नाही. भारताच्या आतापर्यंत 30 षटकात 5 गाडी गमावत 135 धावा झालेल्या आहेत.
- हेही वाचा:
- भारताने गमावल्या 4 विकेट; यष्टिरक्षक ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच
- भारत विरुध्द न्यूझीलंडच्या तिसऱ्या निर्णायक एकदिवसीय सामन्याआधी पावसामुळे नाणेफेकीला होतोय उशीर; जाणून घ्या कसे आहे तेथील हवामान