मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेहदी महान मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर बांगलादेशने 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या.
श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला आहे. श्रेयसचे कारकिर्दीतील तिसरे वनडे शतक १८ धावांनी हुकले. डावाच्या ३५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने त्याला अफिफ हुसेनकरवी झेलबाद केले. श्रेयस 102 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. भारतीय फलंदाजाने आपल्या खेळीत 102 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर अक्षर पटेल ही आपली अर्धशतकी खेळी करून 56 धावा करून होसैनच्या गोलंदाजीवर हसनच्या हाती झेल देत झेलबाद झाला. भारताच्या यावेळी 40 षटकात 6 गडी गमावत 193 धावा झाल्या आहेत. भारताला विजयासाठी 60 चेंडूत 7.9 प्रति षटकाच्या सरासरीने 79 धावा हव्या आहेत.
भारताचे सुरुवातीच्या फळीतले फलंदाज खास काही कामगिरी दाखवू शकले नाहीत. मात्र श्रेयस अय्यरने या सामन्यात या खेळाडूंची कसर भरून काढली. या सामन्यात विराट, शिखर धवन आणि के एल राहुलला म्हणावी तशी खेळी दाखवता आली नाही.
मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या यजमानांनी मेहदी हसन मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन तर उमरान मलिक आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
- हेही वाचा:
- टीम इंडिया दडपणाखाली; शकिबने भारताला दिला तिसरा धक्का, वॉशिंग्टन खेळू शकला नाही ‘सुंदर’ इनिंग
- टीम इंडिया अडचणीत; 100 धावांच्या आतच पडल्या 4 विकेट, बांग्लादेशच्या गोलंदाजांचा दबदबा