मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला आज 25 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. अनुभवी खेळाडू शिखर धवन वनडे मालिकेचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळला जात आहे. तत्पूर्वी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून सलामीला आलेली कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांची जोडी कमाल करताना दिसत होती मात्र 50 धावा करताच शुभमन गिल फर्ग्यूसन च्या गोलंदाजीवर कॉनवेच्या हाती झेल देत झेलबाद झाला. त्यानंतर भारताला आणखी एक धक्का शिखर धवनच्या रुपात बसला आहे.
भारतीय संघाला दुसरा धक्का कर्णधार शिखर धवनच्या रूपाने बसला आहे. धवनने 77 चेंडूत 72 धावा केल्या आणि टीम साऊदीच्या चेंडूवर फिन ऍलनने झेलबाद केले. चांगल्या लयात खेळी करत असतानाच शिखर धवन आपली विकेट गमावून बसला. त्यामुळे त्याला आपले शतक बनवता आले नाही. आता ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून त्याच्या जोडीला श्रेयस अय्यर फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये 20 धावांची भागीदारी झाली आहे. भारताने 30 षटकात 2 गडी गमावत 144 धावा केली आहेत. उरलेल्या 20 षटकात भारताला आणखी चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे.
- हेही वाचा:
- शिखर धवन-शुभमन गिलची पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त सुरुवात; पहा सविस्तर वृत्त
- शिखर धवनने ठोकले वनडे कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक; मात्र भारताला मिळाला शुभमनच्या रुपात पहिला झटका