मुंबई : सध्या महागाईच्या काळात वाहनांची खरेदी कमी झाली आहे. सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळेही वाहन कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री घटली आहे. देशातील सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल क्षेत्र आधीच अडचणीत आहे. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हे संकट आणखी वाढले आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. सियामच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिना वाहन उद्योगासाठी वाईट ठरला आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांनी घट झाली असली तरी या काळात दुचाकींच्या विक्रीत तब्बल 27 टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी वाहनांची खरेदी बंद झालेली नाही. लोक वाहनांची खरेदी करत आहेत. या काळात तुम्ही जर दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील या काही शानदाच दुचाकी आहेत.
Yamaha FZ V3
शार्प डिझाइन असलेल्या या दुचाकीमध्ये 149cc, एअर-कूल्ड, 2 व्हॉल्व्ह, सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 13.2hp पॉवर आणि 12.8Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या दुचाकीची किंमत 98,000 रुपये आहे आणि दुसऱ्या FZS दुचाकीची किंमत 97,680 रुपये आहे
Honda CB Hornet 160R
या शानदार दुचाकीमध्ये कंपनीने अनेक खास फिचर दिले आहेत. यामध्ये एलइडी हेडलाइट आणि डिजिटल कन्सोल आहे. यात 162.7 सीसी, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 15.09hp पॉवर आणि 14.5Nm टॉर्क जनरेट करते. दुचाकीची सुरुवातीची किंमत 86,500 रुपये आहे.
TVS Apache 180
लोकप्रिय दुचाकीची किंमतही एक लाखांच्या आत आहे. दुचाकीमध्ये 177.4 सीसी इंजिन आहे, जे 16.62 पॉवर आणि 15.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या दुचाकीची सुरुवातीची किंमत 91,291 रुपये आहे.
फेब्रुवारी महिन्यात कार-दुचाकी कंपन्यांना झटका; ‘त्या’ कारणांमुळे घटलीय वाहनांची विक्री..