मुंबई : स्वदेशी स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने ‘Micromax In Note 2’ हा नवीन स्मार्टफोन देशात लाँच केला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,490 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट ऑफरमध्ये हा फोन 12,490 रुपयांना खरेदी करता येईल. फोनची विक्री 30 जानेवारी 2022 पासून सुरू होईल. फोन AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G95 आणि 5000mAh बॅटरी सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.
Micromax In Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा स्क्रीन रिफ्रेश दर 60Hz आहे. फोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G95 समर्थित आहे. फोन Android 11 वर कार्य करतो. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि सिंगल स्पीकर देण्यात आला आहे.
Micromax In Note 2 स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. Micromax In Note 2 स्मार्टफोनच्या मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48MP आहे. याशिवाय 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP डेप्थ आणि मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, हा फोन चीनी कंपन्यांना जोरदार टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे. देशात सध्या चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगलाही देशात जबरदस्त प्रतिसाद मिळतो. या विदेशी कंपन्या आहेत. भारतीय कंपन्यांच्या फोनला मात्र फार मागणी नाही. आता काही भारतीय कंपन्यांनी नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. त्यात मायक्रोमॅक्सच्या या नव्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनची विक्री 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. देशातील लोक या फोनला किती प्रतिसाद देतात, हा फोन खरेच चीनी कंपन्यांना टक्कर देणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.