बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने निक जोनासशी लग्नं केलं आणि ती अमेरिकेतच स्थिरावली. यंदाच्या जानेवारीत प्रियांका आई झाली. लेक मालतीचे चेहरा न दाखवता फोटोही तिने चाहत्यांशी शेअर केले. अमेरिकेत एक छानसं हॉटेल प्रियांका चालवत आहे. शिवाय हॉलिवूडमध्ये प्रियांका अभिनयही करत आहे. पण भारताच्या या लेकीला तीन वर्षांनी माहेरची आठवण आली. नुकतीच प्रियांका भारतात आली ती तीन वर्षांनी. विमानतळावरचे व्हिडिओही तिने शेअर केले. पण लेक मालतीला मात्र तिने सोबत आणलेलं नाही. हे पाहून चाहते लेक मालती कुठे आहे असं विचारत आहेत. मालतीला अमेरिकेतच ठेवून प्रियांका मुंबईत का आलीय हे लवकरच कळेल.
फॉर्च्यून इंडिया यादी : कोण आहेत भारतातील सर्वात शक्तिशाली महिला.. जाणून घ्या
डेनिमच्या कॅज्युअल लुकमध्ये प्रियांकाला पाहून चाहते खुश झालेत. तसं प्रियांका सोशलमीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लेक आणि नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडिओ ते शेअर करत असते. पण प्रत्यक्ष मुंबईत आलेल्या प्रियांकाला पाहून चाहत्यांना आनंद झाला नसता तरच नवल. मुंबईत आल्यानंतरच आनंद प्रियांकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आता मुंबईत आल्यानंतर पिगी चॉप्स काय काय करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहेच.
घरी आल्यानंतर आधी प्रियांकाने भरपूर विश्रांती घेतली. करण जोहरचा कॉफी विथ करण शोदेखील तिने टीव्हीवर पाहिला. हा फोटोही तिने शेअर केला आहे. या कॅप्शनमध्ये ती असं लिहितेय की, मुंबईत येऊन जर करणचा कॉफी विथ करण शो पाहिला नाही तर इथे येणं व्यर्थ आहे. प्रियांका जंकफूड प्रेमी आहे हे तिच्या पक्क्या चाहत्यांना माहिती आहेच. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर तिने आवडीच्या जंकफूडवरही ताव मारला.
मोठी बातमी…! ‘त्या’ प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावाला अटक; बॉलिवूडमध्ये खळबळ
प्रियांकाचे मुंबईत पोहोचल्याचे व्हिडिओ व्हायरल होताच एक गोष्ट मात्र चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. चाहत्यांना असं वाटत होतं की प्रियांकासोबत लेक मालतीही असेल आणि या निमित्ताने तिलाही पाहता येईल. पण इथे तर चाहत्यांची निराशाच झाली. सध्या तरी प्रियांका एकटीच आली आहे. ना तिच्यासोबत लेक मालती आहे ना नवरा निक. अकरा महिन्यांच्या मालतीला अमेरिकेत सोडून प्रियांका जीवाची मुंबई आणि माहेरपण करून घ्यायला आलीय.
प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये काही शो आणि सिनेमा करत आहे. लवकरच ती एका बॉलिवूड सिनेमातही दिसणार आहे, त्यामुळे ही भेट त्यासाठीच असेल का अशी शंकाही चाहत्यांना वाटतेय. फरहान अख्तरच्या जी ले जरा या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे. आलियाच्या डिलिव्हरीनंतर या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार असून पुढच्यावर्षी प्रियांका हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी दिसणार आहे. तूर्तास तरी प्रियांकाचं दर्शन सोशलमीडियावरच चाहत्यांना घ्यावं लागणार आहे.