माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आहेत. मात्र, हे मोठे आणि महत्वाचे पद त्यांना खुणावत असल्याच्या बातम्या येत असतात. त्यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
त्यावर मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. मात्र, तरीही त्यांनी हे पद नकोच असे अजिबात म्हटलेले नाही. ‘मला घाई नाही’ असे सांगून त्यांनी फ़क़्त आपण या पदासाठी घाईत नसल्याचे म्हटले आहे.
चव्हाण यांनी भोकर येथील कार्यक्रमात यावर भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे महाविकास आघाडीचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी अजिबात करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही.
त्यामुळेच चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधी गोटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन : सचिन पाटील