मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याचवेळी टीम साऊदीने हॅटट्रिक घेतली. त्याने या सामन्यात उत्तम गोलंदाजीचा नमुना सादर केला.
टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 191 धावा केल्या. युझवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्टच्या जागी अॅडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.
फिन ऍलनच्या रूपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर ऍलनने खाते न उघडता अर्शदीप सिंगला झेलबाद केले. कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. न्यूझीलंडने पहिल्या 5 षटकात 1 गाडी गमावत 25 धावा केलेल्या आहेत. विल्यम्सनने 11 धावा केल्या असून डी कॉनवे हाही 9 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडला विजयासाठी 90 चेंडूत 167 धावांची गरज आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: आता ‘हा’ दिग्गज क्रिकेटरही सुर्यकुमारविषयी काय म्हणाला पहा
- सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज शतकी खेळी; भारताने दिले न्यूझीलंडला 192 धावांचे लक्ष्य