मुंबई: भारतीय क्रिकेट संघ पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात यजमान बांग्लादेशविरुद्ध लढत आहे. हा सामना मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, तर बांग्लादेशचे नेतृत्व सलामीवीर लिटन दास करत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. बांग्लादेशमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने आपल्या भूमीवर यजमानांविरुद्ध 4 पैकी तीन एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांग्लादेशचे संघ ३६ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारताने 30 सामने जिंकले आहेत तर बांग्लादेशच्या खात्यात 5 विजय आहेत. एक सामना अनिर्णित आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मिळालेली 7 वर्षे जुनी जखम भरून काढायची आहे. 2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशने मायदेशात एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला होता.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
बांग्लादेशचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
लिटन दास (कर्णधार), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, यासिर अली, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.
- हेही वाचा:
- विराट कोहलीने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी केल्यास, या माजी दिग्गज खेळाडूच्या विक्रमाला मागे टाकू शकतो, जाणून घ्या सविस्तर
- रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार कोण असेल? हे खेळाडू आहेत रेसमध्ये, जाणून घ्या या खेळाडूंविषयी