मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना रविवारी (20 नोव्हेंबर) बे ओव्हल, माउंट मौनगानुई मैदानावर खेळवला जाईल. सिराजचा पहिला T20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मुसळधार पावसामुळे टॉस होऊ शकला नाही. आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा प्रश्न पुन्हा पुन्हा क्रिकेट चाहत्यांच्या मनात येतोय की दुसऱ्या सामन्यावरही पावसाचा परिणाम होणार का?
पावसाची 64 टक्के शक्यता
अर्थात, दुसऱ्या टी-20 सामन्याचे ठिकाण वेगळे असू शकते, परंतु हवामानाबद्दल बोलायचे झाले, तर इथेही पाऊस आपली साथ सोडणार नाही. स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या T20 सामन्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या सुरुवातीला ६ टक्के पावसाचा अंदाज होता पण पहिल्या डावानंतर पावसाचा अंदाज ६४ टक्क्यांपर्यंत वाढेल. न्यूझीलंडच्या हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी तापमान 15 ते 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
खेळपट्टीचा अहवाल
माऊंट मौनगानुई येथील खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. या मैदानावर लहान चौकार आहेत जे फलंदाजांच्या जलद धावा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या विकेटवर सरासरी 165 धावा झाल्या आहेत. 12 सामन्यांत 6 वेळा 180 पेक्षा जास्त स्कोअर केला आहे. या दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे. सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज उमरान मलिक, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यासारखे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (टी२० विकेट), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
- हेही वाचा:
- T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून काय आहे हा निर्णय
- Delhi Air Pollution: दिल्लीची हवा बनली अधिक विषारी; हवेची गुणवत्ता ‘खूप खराब’, नोएडासह NCR चा AQI जाणून घ्या