मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवार, ४ डिसेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचा वरचष्मा मानला जातो, पण कर्णधार रोहित शर्मा घरच्या मैदानावर बांग्लादेश संघाला कमकुवत समजण्याची चूक करणार नाही. आपला संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवेल असे त्याने सामन्यापूर्वी स्पष्ट केले आहे. या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवार 4 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.
भारत-बांग्लादेश पहिला एकदिवसीय सामना कोणत्या चॅनेलवर थेट पाहता येईल?
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी (हिंदी), सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी (तमिळ आणि तेलुगु), सोनी स्पोर्ट्स टेन 5 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी (इंग्रजी) वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
बांग्लादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.
- हेही वाचा:
- बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आणखी 3 धावा होताच… रोहित शर्मा मोडणार माजी भारतीय कर्णधाराचा हा मोठा विक्रम
- बांग्लादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने केला कसून सराव; जाणून घ्या या मालिकांच्या वेळापत्रकाविषयी