मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी नेपियरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता मालिकेत 1-0 ने पुढे आहे. पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सूर्यकुमार यादव (नाबाद 111) च्या धडाकेबाज शतकामुळे टीम इंडियाने 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ १२६ धावांत गारद झाला. अष्टपैलू दीपक हुडाने अवघ्या 10 धावांत चार बळी घेतले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामन्यांची मालिका दुपारी 12 वाजल्यापासून रंगणार आहे. सकाळी 11.30 पासून नाणेफेक अर्धा तास आधी होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील DD Sports वर पाहता येईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील तिसर्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. हिंदी, इंग्रजी, तामिळ, कन्नड आणि तेलुगू या 5 भाषांमध्ये सामन्याचे समालोचन चाहत्यांसाठी उपलब्ध असेल.
भारताचे संभाव्य खेळाडू: इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचे संभाव्य खेळ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या १२६ धावात झाला गारद; भारताचा दुसऱ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय
- T20 मध्ये सर्वाधिक शतक ठोकण्यात ‘या’ संघातील खेळाडू आहेत अव्वल स्थानावर; जाणून घ्या सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या संघांविषयी