मुंबई: टीम इंडियाला टी-२० नंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतही चांगली कामगिरी करायची आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. पहिला सामना ऑकलंडमध्ये होणार आहे. मात्र, वनडेतील मागील विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. भारतीय संघ 3 वर्षांपासून किवी संघाला पराभूत करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा मार्ग सोपा नसेल. तत्पूर्वी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे तर, टीम इंडियाला एकही विजय मिळवता आलेला नाही. किवी संघाने 4 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्यात 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचाही समावेश आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा १८ धावांनी पराभव झाला. एमएस धोनीचाही हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेत क्लीन स्वीप
2020 मध्ये, भारतीय संघाने शेवटची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडकडून त्यांच्या घरी खेळली होती. त्यानंतर 3 सामन्यांच्या मालिकेत त्यांना 0-3 असा दारूण पराभव पत्करावा लागला. हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांना 4 गडी राखून पराभूत व्हावे लागले होते. ऑकलंडमध्ये खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना यजमान संघाने 22 धावांनी जिंकला तर शेवटचा सामना 5 विकेटने जिंकला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाला घरच्या मैदानावर पुन्हा एकदा या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे.
भारताने 55 एकदिवसीय सामने जिंकले आहेत
मात्र, एकूण एकदिवसीय विक्रमाचा विचार करता टीम इंडिया विजयांच्या बाबतीत न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 110 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघ 55 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. न्यूझीलंडने 49 जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला, तर 5 चा निकाल लागला नाही. यापूर्वी झालेल्या T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडले होते.
दोन्ही संघ अश्याप्रकारे
भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, दीपक चहर, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, संजू सॅमसन, कुलदीप सेन, शाहबाज अहमद, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मिचेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउदी.
- हेही वाचा:
- संजू सॅमसन कि दीपक हुडा एकदिवसीय सामन्यात कोणाला मिळणार संधी? अशी असू शकते संभाव्य प्लेइंग-11, जाणून घ्या सविस्तर वृत्त
- टीम इंडिया गुंतली एकदिवसीय सामन्याच्या तयारीत, शिखर धवनची सरावादरम्यान दमदार फलंदाजी; पहा हे सविस्तर वृत्त