मुंबई: मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या यजमानांनी मेहदी हसन मिराजचे नाबाद शतक आणि महमुदुल्लाहच्या 77 धावांच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 271 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन तर उमरान मलिक आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
रोहित शर्माच्या जागी ओपनिंगला उतरलेला विराट कोहली स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर विराटला वेगवान गोलंदाज इबादत हुसेनने त्रिफळाचीत केले. विराट 6 चेंडूत 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
बांगलादेशने त्यानंतर आणखीन एक भारताला धक्का दिला आहे. 3 षटकांच्या आत भारतीय संघाने विराट कोहली आणि शिखर धवनच्या विकेट्स गमावल्या आहेत. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुस्तफिझूर रहमानने शिखर धवनला मेहदी हसन मिराजच्या हाती झेलबाद केले. शिखर 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.
- हेही वाचा:
- मेहदी हसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर बांग्लादेशने भारताला दिले 272 धावांचे लक्ष्य
- विराट कोहलीने आज केली तुफानी फलंदाजी तर तुटतील विक्रम; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची करू शकतो बरोबरी