मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज म्हणजेच बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियासाठी या सामन्यातील विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारत मालिका बरोबरीत आणू शकतो. त्याचबरोबर यजमान टीम इंडिया मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली असून निम्म्याच्यावर भारताचा संघ मैदानाबाहेर परतला आहे.
आज भारताची फलंदाजी खूपच सुमार झाली असून भारताने आपले 6 गडी गमावले आहेत. भारताला दीपक हुडा च्या रुपात 6 व झटका मिळाला आहे. या सामन्यात तोही चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. तो अवघ्या 12 धावा करून साउदीच्या गोलंदाजीवर विकेटकीपर लाथमच्या हाती झेल देत झेलबाद झाला. यांनतर चाहर फलंदाजी करण्यासाठी आला असून तो वाशिंग्टनला साथ देत आहे. यावेळी भारताने 35 षटकात 6 गडी गमावत 156 धावा केल्या आहेत.
- हेही वाचा:
- अर्र.. भारताला मिळाला दुसरा झटका शिखर धवनही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला; ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर करतेय खेळी
- गौतम गंभीर ‘या’ खेळाडूला भावी कर्णधार म्हणून पाहतोय; सांगितले याचे मोठे कारण