मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज म्हणजेच बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. टीम इंडियासाठी या सामन्यातील विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारत मालिका बरोबरीत आणू शकतो. त्याचबरोबर यजमान टीम इंडिया मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
अॅडम मिल्नेने गिलला मिचेल सँटनरकरवी झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यांनतर धवनही आज म्हणावी तशी चमक दाखवू शकला नाही तोही अवघ्या 28 धावा काढून शिखर धवनही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. डावाच्या 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धवन वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने त्रिफळाचीत केला. धवन 45 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
तिसऱ्या वनडेतही ऋषभ पंतचा खराब फॉर्म कायम आहे. पंतला डेरिल मिशेलने वैयक्तिक १० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डावाच्या 21व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतला ग्लेन फिलिप्सने झेलबाद केले. 85 धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताने तिसरी विकेट गमावली. श्रेयस अय्यरला पाठिंबा देण्यासाठी सूर्यकुमार यादव आला होता मात्र तो आजही आपली जादू दाखवू शकला नाही. तोही अवघ्या 6 धावा करून मिल्नेच्या गोलंदाजीवर साउदीच्या हाती झेल देत झेलबाद झाला. त्यांनतर दीपक हुडा अय्यरला साथ देण्यास मैदानात उतरला आहे.
भारताने या अखेरच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात लागलीच 4 गडी गमावल्याने भारताची स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे पुढील खेळाडूंना चांगली खेळी करून भारताचा डाव सावरणे गरजेचे बनले आहे.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामन्याचे नाणेफेक जिंकले; भारत करणार प्रथम फलंदाजी
- अर्र.. भारताला मिळाला दुसरा झटका शिखर धवनही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला; ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर करतेय खेळी