मुंबई: निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघ फलंदाजी करत आहे. हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. पावसामुळे नाणेफेक नियोजित वेळेपासून 15 मिनिटे उशिराने सुरू झाली. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे.
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यावरही पावसाची सावली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधू शकतो. ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान किवी संघाने 7 गडी राखून विजय मिळवला तर हॅमिल्टन येथे खेळली गेलेली मालिकेतील दुसरी वनडे पावसामुळे वाहून गेली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 12.5 षटकात 1 गडी गमावून 89 धावा केल्या. त्यानंतर सततच्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही आणि पंचांनी तो रद्द घोषित केला.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि शुभमन गिल आले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने न्यूलँडसाठी गोलंदाजीची सुरुवात केली. पावसामुळे सामन्यातील नाणेफेक 15 मिनिटे उशीराने सुरू झाली. भारताला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी धवन आणि गिल यांच्यावर आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली असून भारताच्या पहिल्या 4 षटकात गडी न गमावत 16 धावा झाल्या आहेत. धवनने 15 धावा केल्या असून गिल शून्यावर खेळत आहे.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामन्याचे नाणेफेक जिंकले; भारत करणार प्रथम फलंदाजी
- ४१ वर्षांच्या लाजिरवाण्या विक्रमातून भारत सुटू शकेल का? गावस्करही किवी संघाला रोखू शकले नव्हते, जाणून घ्या याबाबतचे सविस्तर वृत्त