मुंबई : जर तुम्ही रिलायन्स जिओ युजर असाल आणि फोन एकदा रिचार्ज केल्यानंतर पुन्हा वर्षभर रिचार्जचा त्रास नको असेल तर जिओकडे तुमच्यासाठी अनेक उत्तम प्लान आहेत. हा Jio चा वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे. जिओच्या या प्लान्समध्ये तुम्हाला 1,095GB पर्यंत डेटा मिळतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉल आणि इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ या जिओचे कोणते अनलिमिटेड प्लान आणि त्यात कोणते फायदे आहेत.
रिलायन्स जिओचा 2879 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या खर्चानुसार जोडले तर Jio च्या या प्लॅनमध्ये एका महिन्याचा खर्च 239.9 रुपये आहे. प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण 730GB डेटा देण्यात आला आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल लाभ मिळतो. प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा एक प्लान 3119 रुपयांचा आहे. प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय प्लानमध्ये 10GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 740GB डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या खर्चानुसार जोडले तर Jio च्या या प्लॅनमध्ये एका महिन्याचा खर्च 259.9 रुपये आहे. डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन प्लानमध्ये 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. प्लानमध्ये मोफत कॉलशिवाय दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्लानमध्ये Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्लान आहे. प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण 912.5GB डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या खर्चानुसार जोडले तर Jio च्या या प्लानमध्ये एका महिन्याचा खर्च 249.9 रुपये आहे. जिओच्या या प्लानमध्ये मोफत कॉल लाभ मिळतो आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. जिओचा हा प्लान 4199 रुपयांचा आहे. प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. प्लानमध्ये एकूण 1095GB डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या खर्चानुसार जोडले तर रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये 1 महिन्याचा खर्च 349.9 रुपये आहे. प्लॅनमध्ये फ्री कॉलचा फायदा मिळतो. तसेच, प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये Jio अॅप फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे.