मुंबई: न्यूझीलंडचा दौरा संपवून भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या बांगलादेश दौऱ्यापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती आणि आता ते सर्व पहिल्या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. टीम इंडिया 4 डिसेंबर म्हणजेच रविवारपासून एकदिवसीय मालिका सुरू करणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह संघाचे सर्व स्टार खेळाडू घाम गाळताना दिसले.
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर स्टार खेळाडूंना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वजण या दौऱ्यावरून परतत आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल यांच्या नावाचाही समावेश आहे. हे दोघेही या मालिकेत दिसणार आहेत. बांगलादेश मालिका ही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची सुरुवात मानली जात आहे. वनडेमध्ये रोहित आणि राहुलची जोडी ओपनिंग करताना पाहायला मिळू शकते.
Snapshots from #TeamIndia's first training session in Bangladesh ahead of the three-match ODI series.#BANvIND
📸 – BCB pic.twitter.com/AXncaYWeup
— BCCI (@BCCI) December 2, 2022
शुक्रवारी, बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हँडलवर संघाच्या खेळाडूंच्या नेट सरावाची छायाचित्रे शेअर केली. या छायाचित्रांमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. या मालिकेदरम्यान हे सर्व खेळाडू पाहायला मिळणार आहेत.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:-
4 डिसेंबर, पहिली एकदिवसीय (ढाका) सकाळी 11.30 वाजता
7 डिसेंबर, दुसरी वनडे (ढाका) सकाळी 11.30 वाजता
10 डिसेंबर, तिसरा एकदिवसीय (ढाका) सकाळी 11.30 वाजता
कसोटी मालिकेचे वेळापत्रक :-
14-18 डिसेंबर, पहिली कसोटी (चटगाव)
22-26 डिसेंबर, दुसरी कसोटी (ढाका)
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
- हेही वाचा:
- तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे झाला रद्द, न्यूझीलंडने मालिका १-० ने जिंकली
- बांगलादेश दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने बोलावली आढावा बैठक; संघ प्रशिक्षकाबाबत घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय