मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. या मालिकेतील पहिला सामना दोन्ही संघांमध्ये ४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाही बांगलादेशमध्ये पोहोचली आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना बांगलादेशमध्ये पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
वास्तविक, चहर यांनी मलेशिया एअरलाइन्समध्ये प्रवास करण्याचा अनुभव शेअर केला आहे. जिथे त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘मलेशिया एअरलाइन्ससोबत प्रवास करण्याचा अनुभव खूपच वाईट होता. आधी त्यांनी आम्हाला न कळवता आमची फ्लाइट बदलली. याशिवाय बिझनेस वर्गाकडे जेवणही नव्हते. आम्ही गेल्या २४ तासांपासून आमच्या सामनाची वाट पाहत आहोत. विचार करण्याची बाब आहे, उद्या आपला खेळ आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. टी-20 विश्वचषकानंतर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र या मालिकेत काही खेळाडूंवर नजर असेल. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर नजर असेल. विश्वचषकात दोन्ही फलंदाज फ्लॉप ठरले होते. यानंतर त्यांना मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. मात्र आता बांगलादेशविरुद्ध भारतीय सलामीवीर कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मालिकेपूर्वी फुटला घाम
बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी संघाच्या खेळाडूंनी नेटमध्ये प्रचंड घाम गाळला. यावेळी टीमचा स्टार बॅट्समन विराट कोहलीसोबत रोहित शर्मा, इशान किशन आणि टीमचे इतर खेळाडूही दिसले. आगामी विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची ठरू शकते.
- हेही वाचा:
- बांग्लादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने केला कसून सराव; जाणून घ्या या मालिकांच्या वेळापत्रकाविषयी
- रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार कोण असेल? हे खेळाडू आहेत रेसमध्ये, जाणून घ्या या खेळाडूंविषयी