मुंबई: बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. अष्टपैलू शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे, तर वेगवान गोलंदाज कुलदीप सेनच्या जागी झंझावाती गोलंदाज उमरान मलिक खेळत आहे. उमरानने नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे पदार्पण केले. बांगलादेशची फलंदाजी सुरू झाली आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारताला सुरुवातीचे यश मिळवून दिले आहे. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सिराजने सलामीवीर अनामूल हकला एलबीडब्ल्यू आऊट केले. अनामूल 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. यावेळी लिटन दास आणि नजमुल हसन शांतो ही जोडी क्रीजवर आहे. बांग्लादेशच्या पहिल्या 5 षटकात 1 गडी गमावत 23 धावा झाल्या आहेत.
कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा अँड कंपनीला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.
- हेही वाचा:
- बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन बदल; जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त
- विराट कोहलीने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी केल्यास, या माजी दिग्गज खेळाडूच्या विक्रमाला मागे टाकू शकतो, जाणून घ्या सविस्तर