मुंबई: बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाज शानदार गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे यजमान संघाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनंतर उमरान मलिक आपल्या वेगाची जादू दाखवत आहे. गोलंदाजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने लागोपाठच्या चेंडूंवर बांग्लादेशचे दोन विकेट घेत यजमानांना मोठा धक्का दिला.
उमरान मलिकने महमुदुल्लाला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. महमुदुल्लाह आणि मेहदी हसन मिराज यांनी सातव्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. महमुदुल्लाह 96 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा अँड कंपनीला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
- हेही वाचा:
- बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन बदल; जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त
- विराट कोहलीने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी केल्यास, या माजी दिग्गज खेळाडूच्या विक्रमाला मागे टाकू शकतो, जाणून घ्या सविस्तर