मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे बुधवारपासून सुरू होत आहे. हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरो अशी स्थिती आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला तीच चूक पुन्हा करायला आवडणार नाही. मागील सामन्यात खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमुळे रोहित शर्मा अँड कंपनीला 1 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या वनडेत एकीकडे टीम इंडिया पुनरागमनाच्या आशेने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे यजमान संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. मेहदी हसन मिराजला बांगलादेश संघातून वगळण्यात आले आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
भारत आणि बांगलादेशचे संघ मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमानांनी 1 गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. रोहित शर्मा आणि कंपनीसाठी ही करा किंवा मरो स्पर्धा आहे. बांगलादेशने मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवली आहे.
- हेही वाचा:
- बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव; भारताच्या पराभवाची ही आहेत कारणे
- Jio Fiber Plans: 699 रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये 14 ओटीटी अॅप्सचे फायदे मिळतील, कसे ते येथे जाणून घ्या