मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) 12 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 2000-2000 रुपये थेट देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. त्याचबरोबर आता शेतकरी तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले आहेत. पण सरकारने पीएम किसान योजनेत काही बदल केले आहेत हे शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे. जर तुम्ही नवीन नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला 13व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. आधार कार्डाशिवाय 13व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार नाही. अशा परिस्थितीत पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे.
वास्तविक, अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करताना चुकीचे आधार कार्ड क्रमांक टाकल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत हप्त्याची रक्कम त्याच्या खात्यात पोहोचत नाही. त्याचबरोबर आता केंद्र सरकारने पीएम किसानसाठीही ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट न केलेले शेतकरी या योनाच्या लाभापासून वंचित राहतील. तुम्हाला पीएम किसानचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी अपडेट करू शकता.
यासोबतच आता पीएम किसान योजनेसाठी रेशन कार्डही अनिवार्य करण्यात आले आहे. आता नोंदणी करताना तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या खात्यात 13 व्या हप्त्याची रक्कम येणार नाही. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणेही बंधनकारक झाले आहे. जमिनीच्या नोंदींची पडताळणी न करणाऱ्या लाभार्थीचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये दिले जातात. विशेष म्हणजे हे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 च्या हप्त्यात दिले जातात.
- हेही वाचा:
- Solar Energy: हे देशातील पहिले सोलर गाव म्हणून होणार घोषित; येणाऱ्या काळात होतील गावे स्वयंपूर्ण…
- अर्र… महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने चिंतीत; जाणून घ्या काय दर मिळतो आहे कांद्यांना