मुंबई: 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. दीपक हुडा आणि दीपक चहर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे, तर यजमान न्यूझीलंडचा संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका ताब्यात घेण्याच्या इराद्याने उतरेल. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांना 306 धावांचे आव्हान राखण्यात अपयश आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाची सावली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन अँड कंपनीकडे सहाव्या गोलंदाजाची कमतरता होती. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हॅमिल्टनमध्ये 7 वनडे सामने खेळले गेले आहेत. यजमान संघाने 6 सामने जिंकले आहेत तर भारताचा एक विजय आहे.
पावसामुळे खेळ थांबेपर्यंत टीम इंडियाने 4.5 षटकात कोणतेही नुकसान न करता 22 धावा केल्या होत्या. हॅमिल्टनमध्ये आता पाऊस थांबला आहे. हा सामना आता 29-29 षटकांचा खेळवला जात आहे. पावसानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेचा सामना पुन्हा सुरू झाला आहे. धवन आणि गिल ही जोडी क्रीझवर उतरली होती. मात्र खेळ चलू झाल्यानंतर भारताने कर्णधार शिखर धवनची विकेट गमावली आहे. डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धवन मॅट हेन्रीकरवी लॉकी फर्ग्युसनच्या हाती झेलबाद झाला. धवन 10 चेंडूत 3 धावा करून बाद झाला.
29 षटकांच्या या सामन्यात भारताने पहिल्या 10 षटकात 1 गडी गमावून 60 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 40 धावा करून खेळत आहे तर सूर्यकुमार यादव 10 धावा करत त्याला साथ देत आहे. शिखर धवन 10 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. पावसामुळे हा सामना आता 29-29 षटकांचा करण्यात आला आहे.
- हेही वाचा:
- कर्णधार शिखर धवन न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात करू शकतो बदल; पहा कोणाला संधी मिळण्याची आहे शक्यता
- Jio वापरकर्त्यांना मोठा धक्का; आता Disney+ Hotstar मोफत बघता येणार नाही, जाणून घ्या यामागचे कारण