मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 19 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. इटानगरमधील होलंगी येथे बांधण्यात आलेल्या या विमानतळाला ‘डोनी पोलो विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे. डोनी पोलो विमानतळ हे अरुणाचल प्रदेशसाठी तिसरे कार्यरत असणारे विमानतळ असेल. ज्यामुळे ईशान्य प्रदेशातील विमानतळांची संख्या 16 वर जाईल. 1947 ते 2014 पर्यंत ईशान्येत फक्त 9 विमानतळ बांधले गेले. गेल्या 8 वर्षात सात विमानतळ बांधण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ईशान्येकडील कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर विशेष भर दिल्याने या प्रदेशातील विमानतळांचा हा वेगवान विकास शक्य झाला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या विमानतळाची पायाभरणी पंतप्रधानांनी स्वतः केली होती. मिझोराम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या पाच ईशान्येकडील राज्यांतील विमानतळांनी 75 वर्षांत प्रथमच उड्डाणे सुरू केली आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशला याचा खूप फायदा होणार आहे.
2014 पासून ईशान्येकडील विमानांच्या हालचालीतही 113% वाढ झाली आहे. 2014 मध्ये ईशान्येकडे दरमहा 852 उड्डाणे होती, जी 2022 मध्ये वाढून 1,817 झाली आहे.
- हेही वाचा:
- मग सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत मोदीजी; “त्या” नेत्याने उपस्थित केलाय कळीचा मुद्दा
- न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका आजपासून; भारताच्या ‘या’ खेळाडूंनी केला कसून सराव