मुंबई: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यजमान किवी संघ ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ३० नोव्हेंबरला अंतिम सामना खेळणार आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. यानंतर संघाला बांगलादेश दौऱ्यावर (IND vs BAN) जायचे आहे. शिवाय 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. पण न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले 8 खेळाडू बांगलादेश वनडे मालिकेत दिसणार नाहीत. नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत.
रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना टी-२० विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली होती. पण केएल राहुल आणि विराट कोहलीही बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी झालेले शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांना बांगलादेश दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही.
पाटीदार आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर असेल नजर
रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी या दोन युवा क्रिकेटपटूंना बांगलादेश दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. या दोघांनी देशांतर्गत स्पर्धेच्या चालू मोसमात बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर इशान किशन येथे ऋषभ पंतसोबत यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दौऱ्यातून वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. फिरकीपटू म्हणून शाहबाज अहमद, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना येथे चांगली कामगिरी करायला आवडेल. वनडे मालिका ४, ७ आणि १० डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध भारतीय एकदिवसीय संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
- हेही वाचा:
- भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे झाला रद्द; यजमानांनी मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
- Solar Energy: हे देशातील पहिले सोलर गाव म्हणून होणार घोषित; येणाऱ्या काळात होतील गावे स्वयंपूर्ण…