मुंबई: न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या ३-३ सामन्यांच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही मालिकेतील किवी संघात फारसा बदल झालेला नाही. दोन मालिकांमध्ये फक्त काही खेळाडूंची अदलाबदली पाहायला मिळणार आहे. पण, सर्वात आश्चर्यकारक निर्णय म्हणजे भारताविरुद्ध प्रथमच फिन अॅलन टी-२० आणि वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे. टी-20 मालिकेत तो खेळणार हे निश्चित दिसत होते. पण, न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने एकदिवसीय मालिकेसाठीही त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, ही मोठी गोष्ट आहे.
वनडे आणि टी-२० साठी निवडलेल्या संघात मार्टिन गुप्टिलच्या जागी फिन ऍलनला प्राधान्य देण्यात आले आहे. 23 वर्षीय अॅलनला आतापर्यंत केवळ 23 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 8 वनडे खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, भारताविरुद्ध तो यापैकी एकही खेळलेला नाही. म्हणजे त्याला अजून भारताविरुद्ध पदार्पण करायचे आहे.
ट्रेंट बोल्ट भारताविरुद्ध खेळणार नाही
वनडे आणि टी-२० मालिकेत न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी टीम साऊदी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि अॅडम मिल्ने यांच्या खांद्यावर असेल. यामध्ये साऊथी आणि हेन्री हे फक्त एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग आहेत. या सर्वांशिवाय ट्रेंट बोल्ट भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंड संघाचा भाग असणार नाही.
फिनला संधी देण्याबाबत निर्णय
किवी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, बोल्ट आणि गप्टिलच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही, परंतु संघाने आता पुढे पाहणे महत्त्वाचे आहे. ट्रेंट बोल्ट आता न्यूझीलंड संघाच्या वार्षिक कराराचा भाग नाही. मार्टिन गप्टिलबद्दल ते म्हणाले की, फिनच्या उदयामुळे आम्हाला आता पुढचा विचार करण्याची संधी मिळाली. या मालिकेद्वारे फिनला टी-२० व्यतिरिक्त एकदिवसीय सामन्यांचा चांगला अनुभव मिळेल.
केन विल्यमसन १५ सदस्यीय संघाचा कर्णधार असेल
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. केन विल्यमसनला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जिमी नीशम तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर असेल. तेथे त्याची जागा हेन्री निकोल्स घेणार आहे. लग्नाच्या तयारीमुळे नीशम तिसऱ्या वनडेतून बाहेर असेल.
भारताविरुद्ध न्यूझीलंडचा संघ (एकदिवसीय आणि T20I दोन्ही)
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (टी२० विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री (ओडीआय), टॉम लॅथम (ओडीआय यष्टिरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी (T20), टिम साउथी, ब्लेअर टिकनर (T20).
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: ICC ने टी 20 विश्वचषक २०२२ मधील सर्वोत्तम संघ केला जाहीर; ‘या’ भारतीय खेळाडूंचाही यात समावेश
- ICC T20 World Cup 2022: इंग्लंड बनला टी 20 तील विश्वविजेता; पाकिस्तानशी केला जुना हिशोब चुकता