मुंबई: क्राइस्टचर्च एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. यजमान संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. त्यामुळे टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. वॉशिंग्टन सुंदरने 51 तर श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने दाखवून दिले की, जर वरच्या फळीतील फलंदाजांनी क्रीजवर संयम दाखवला असता तर टीम इंडियाची ही स्थिती झाली नसती.
भारतीय संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 47.3 षटकांत 219 धावांत आटोपला. किवी संघाकडून अॅडम मिलने आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तत्पूर्वी, निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी फिन ऍलन आणि कॉनवे ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. न्यूझीलंडने पहिल्या 5 षटकात एकही गडी न गमावत 15 धावा केल्या आहेत. आजचा सामना भारताला जिंकणे खूप गरजेचे आहे. आजचा सामना जर भारताने जिंकला तर तीन एकदिवसीय मालिकेत भारत न्यूझीलंडशी 1-1 अशी बरोबरी साधेल.
- हेही वाचा:
- तिसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ठेवले 220 धावांचे लक्ष्य; वॉशिंगटन सुंदरने खेळली अर्धशतकी खेळी
- विराट कोहलीसोबत सामना झाला तर कोण जिंकणार? या प्रश्नावर सूर्यकुमार यादवने दिले मजेशीर उत्तर, पहा काय म्हणाला तो