मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमधील बे ओव्हल येथे खेळला गेला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या (नाबाद 111) खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली. टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 191 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य दिले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या 41व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसरे शतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवच्या 51 चेंडूत नाबाद 111 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या. याबदल्यात न्यूझीलंडच्यासंघाने म्हणावी अशी कामगिरी केली नाही. विल्यमसननला सोडले तर न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. विल्यमसनला सिराजने बाद केले व त्यांनतर न्यूझीलंड संघ ढासळतच गेला. विल्यमसनशिवाय फक्त डी कॉनवे नेच काहीशी चांगली खेळी केली. त्यानेही 25 धावा काढल्या पण सुंदर ने त्याला अर्शदीपच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
सूर्यकुमार यादवचे शानदार शतक आणि दीपक हुडाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताकडून दीपक हुडाने 10 धावांत 4 बळी घेतले. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडचा संघ कमजोर स्थितीत; भारताची विजयाकडे वाटचाल सुरु
- सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज शतकी खेळी; भारताने दिले न्यूझीलंडला 192 धावांचे लक्ष्य