मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याचवेळी टीम साऊदीने हॅटट्रिक घेतली.
ग्लेन फिलिप्सच्या रूपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. फिलिप्स 6 चेंडूत 12 धावा करून युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. डेरिल मिशेल ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र डॅरिल मिशेलच्या रूपाने न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. मिचेलने 11 चेंडूत 10 धावा केल्या आणि दीपक हुडाच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला झेलबाद केले.
त्यानंतर आलेल्या जिमी निशमलाही खाते उघडता आले नाही. जिमी नीशमच्या रूपाने न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला आहे. युझवेंद्र चहलच्या चेंडूवर नीशमने खाते न उघडता इशान किशनकडे झेल दिला. मिचेल सँटनर फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण तोही कमाल दाखवू शकला नाही. तो अवघ्या 2 धावाच करून परतला. न्यूझीलंडला विजयासाठी 18 चेंडूत 81 धावांची गरज आहे. मात्र इतकी धावसंख्या पार कारणे न्यूझीलंडसाठी अवघड असल्याने न्यूझीलंडचा पराभव पक्का असेच चित्र दिसते आहे.
- हेही वाचा:
- भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का; फिन ऍलन स्वस्तात मैदानाबाहेर परतला
- सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज शतकी खेळी; भारताने दिले न्यूझीलंडला 192 धावांचे लक्ष्य