मुंबई: भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपियरमध्ये भिडतील. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी, माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल पार्क येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ टी-20 मालिका आपल्या नावावर करू इच्छितो. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन वैयक्तिक कारणांमुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार नाही. त्यांच्या जागी मार्क चॅपमनचा समावेश करण्यात आला आहे.
सामना सुरु होण्याआधी नेपिअर इथे पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे क्रिकेट रसिक यामुळे निराश झाले. परंतु यानंतर काही वेळाने पाऊस थांबला आणि नाणेफेक असे संकेत असतानाच या ठिकाणी पुन्हा पाऊस चालू झाला. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता नाणेफेक होणार होती. पण पावसामुळे नाणेफेकिला काहीसा उशीर झाला. ताज्या माहितीनुसार नेपियरच्या मैदानावरील कव्हर्स काढण्यात आली आहेत. ग्राउंड्समनच्या मते, अर्ध्या तासानंतर सामना सुरू होऊ शकतो.
पाऊस थांबल्यानंतर नाणेफेक झाले असून न्यूझीलंडने नाणेफेक झाल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज कर्णधार विल्यमसन खेळण्यास नसल्याने त्याच्या जागी साऊदी आज कर्णधार पद सांभाळणार आहे.
टीम इंडियाचा संघ
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (क), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, शुभमन जी. उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ
ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, इश सोधी, टिम साउथी (सी), लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल, हेन्री निकोल्स, ब्लेअर टिकनर.
- हेही वाचा:
- न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी 20 सामन्यात पाऊस पडल्यास भारताच्या ताब्यात असेल मालिका; जाणून घ्या नेपियरमध्ये कसे असेल हवामान
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना होणार नेपियरमध्ये; जाणून घ्या सामना कुठे आणि केव्हा पाहायचा ते