मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना नेपियरच्या मॅक्लिन पार्कवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. नेपियरमध्ये पाऊस थांबला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे.
फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले होती. भारताच्या गोलंदाजीची सुरुवात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी केली. त्यांनतर आलेल्या युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सलामीवीर फिन ऍलनला बाद करून किवी संघाला सुरुवातीचा धक्का दिला आहे. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अॅलनला अर्शदीपने एलबीडब्ल्यू आऊट केले. अॅलन 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर चैपमैन हा फलंदाजीसाठी आला होता मात्र तोही काही खास खेळी करू शकला नाही. तो अवघ्या 12 धावाच काढू शकला आणि सिराज च्या गोलंदाजीवर अर्शदीपच्या हाती चेंडू देत झेलबाद झाला.
सध्या मैदानावर डी कॉनवे आणि फिलिप्स ही जोडी खेळी करत आहेत. यावेळी डी कॉनवे हा चांगली खेळी करत असलेला दिसून येत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या 10 षटकात 2 गडी गमावत 74 धावा झाल्या आहेत.
- हेही वाचा:
- IND VS NZ T20 Series: अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडला दिला पहिला झटका
- न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी 20 सामन्यात पाऊस पडल्यास भारताच्या ताब्यात असेल मालिका; जाणून घ्या नेपियरमध्ये कसे असेल हवामान