मुंबई: क्राइस्टचर्च एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. यजमान संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. त्यामुळे टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. श्रेयस अय्यरने नक्कीच 49 धावांची खेळी खेळली पण इतर फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत. खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने दाखवून दिले की, जर वरच्या फळीतील फलंदाजांनी क्रीजवर संयम दाखवला असता तर टीम इंडियाची ही स्थिती झाली नसती.
तत्पूर्वी, निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. पावसामुळे नाणेफेक नियोजित वेळेपासून 15 मिनिटे उशिराने सुरू झाली. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या 49 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत आणि 47.3 षटकात 219 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात या दोघांशिवाय कोणीच कमाल दाखवू शकले नाहीत. शिखर धवन आणि सुर्यकुमार यादवही या सामन्यात चांगली खेळी करू शकले नाहीत. त्यामुळे भारताचा हा सामना खूपच कमी धावांवर न्यूझीलंडला रोखता आला. आता भारताला न्यूझीलंड संघाला हरवून हा सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्यासाठी गोलंदाजांना कमाल दाखवावी लागणार आहे.
- श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले; भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
- भारत विरुध्द न्यूझीलंडच्या तिसऱ्या निर्णायक एकदिवसीय सामन्याआधी पावसामुळे नाणेफेकीला होतोय उशीर; जाणून घ्या कसे आहे तेथील हवामान