मुंबई: भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ नेपियर येथे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भिडत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीकरत भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
नेपियर येथे होणारा तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पावसामुळे सामना रद्द होण्यापूर्वी टीम इंडियाने 9 षटकात 4 गडी गमावून 75 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईसनुसार टीम इंडियाने त्यावेळी स्कोअर बरोबरीत ठेवला होता. म्हणजेच तिसरा टी-२० सामना बरोबरीत सुटला. यासह टीम इंडियाने तीन टी-20 मालिका 1-0 ने जिंकली. पहिला टी-२० सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या T20 मध्ये भारताने 65 धावांनी विजय मिळवला.
टीम इंडियाची बॅटिंग सुरूवात झाली तेव्हा भारताकडून इशान किशन आणि ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मात्र चांगली सुरुवात झाली असताना किशन ने मिल्नेच्या गोलंदाजीवर चैपमैनच्या हाती झेल देत तो आउट झाला. त्यांनतर पंत ही काही चांगली खेळी करू शकला नाही. तोही लागलीच स्वस्तात आउट झाला. त्यांनतर आलेला श्रेयस अय्यर ही काही कमाल दाखवू शकला नाही. तोही शून्यावर आउट होऊन मैदानाबाहेर परतला. यावेळी साउदीने 2 बळी घेत आपल्या गोलंदाजीचा नमुना दाखवून दिला. यांनतर मैदानावर हार्दिक पांड्याआणि सुर्यकुमार चांगली खेळी करत होते मात्र ईश सोढीने सुर्यकुमारला झेलबाद करायला भाग पाडले.
फिलिप्स आणि कॉनवेच्या फिफ्टीचा झाला नाही उपयोग
यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र सुरुवात चांगली झाली नाही. अॅलन फिनला अर्शदीप सिंगने 3 धावांवर माघारी पाठवले, त्याने मोहम्मद सिराजने मार्क चॅपमनला 12 धावांवर बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. ग्लेन फिलिप्स आणि डेव्हन कॉनवे या जोडीने संघाला सांभाळले आणि धावसंख्या 146 धावांपर्यंत नेली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावून मोठ्या धावसंख्येच्या आशा उंचावल्या.
- हेही वाचा:
- सिराज आणि अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले 161 धावांचे लक्ष्य
- Jio, Airtel आणि Vodafone-Idea साठी नवीन SMS नियम; जाणून घ्या तुमच्यावर काय फरक पडेल